Dhruvraj Elephant Death News : अडीच दशकांची साथ अखेर संपली! अलकनूरच्या श्री करिसिद्धेश्वर देवस्थानचा लाडका 'ध्रुवराज' हत्ती काळाच्या पडद्याआड, प्रकृती खालावल्याने निधन

Dhruvraj Elephant Dies After 25 Years at Alaknur Temple : अलकनूर येथील श्री करिसिद्धेश्वर देवस्थानचा लाडका ध्रुवराज हत्ती उपचार सुरू असताना शुक्रवारी निधन पावला. २५ वर्षांच्या सहवासामुळे ग्रामस्थ आणि भाविकांशी त्याचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते.
Shri Karisiddheshwar temple elephant death

Shri Karisiddheshwar temple elephant death

esakal

Updated on: 

बेळगाव : रायबाग तालुक्यातील अलकनूर येथील श्री करिसिद्धेश्वर देवस्थानचे वैभव आणि गेल्या अडीच दशकांपासून भाविकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला ध्रुवराज हत्ती शुक्रवारी (ता. १३) सकाळी काळाच्या पडद्याआड गेला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्रस्त असलेल्या ध्रुवराजची उपचार सुरू असतानाच निधन झाले. त्याच्या निधनाची वार्ता समजताच अलकनूर गावासह परिसरातील भाविक, ग्रामस्थ आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांमध्ये शोककळा (Dhruvraj elephant Alaknur Belagavi) पसरली.

Loading content, please wait...