अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी

दहा वर्षे सक्तमजुरीची आणि ३१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी
Updated on

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तरुणास जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला दहा वर्षे सक्तमजुरीची आणि ३१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अरविंद महादेव वडर (वय २७) असे त्याचे नाव आहे. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी
गर्भलिंग निदान चाचणी; रुग्णालयावर कारवाई, इचलकरंजीतील प्रकार

पीडित अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात शिकते. तिचे महाविद्यालय सुटण्याच्या वेळी वडर बाहेर थांबायचा. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. तिला थांबवून तुझ्या घरचे माझ्याशी लग्न करून द्यायला का तयार नाहीत, अशी विचारणा करून मारहाणही करायचा. पीडिता गाडीवर न बसल्यास डिक्कीतील ठेवलेल्या चाकूने धाकही दाखवयचा. त्याने मार्च २०१८ ला पीडितेला जबदस्तीने गाडीवर बसवले. लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. नातेवाइकांनी याबाबतची फिर्याद राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार अरविंदवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी
पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात कोल्हापूरचे दोघे ठार

खटल्याचे कामकाज जादा सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सह न्यायाधीश ए. एस. महात्मे यांच्या न्यायालयात सुरू झाले. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी नऊ साक्षीदार तपासले. न्यायालयाने दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर अरविंदला दोषी ठरवले. त्याला कलम ३७६ व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियमानुसार दहा वर्षे सक्तमजुरीची आणि ३१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला या कामात ॲड. भारत शिंदे, ॲड. महेंद्र चव्हाण, पोलिस नाईक माधवी घोडके, अशोक शिंगे यांचे सहकार्य मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Politics Comes Full Circle: Familiar Leaders, Changed Opposition
Boy Rushes from Dinner to Save Cat, Dies in Fatal Electric Shock
Kolhapur Ajra schoolgirl death news
Ramtirth Waterfall Ajara after heavy rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com