Ashok Suresh Yawari death case
esakal
गडहिंग्लज : सात सप्टेंबरला रात्री दहा वाजता तो विवाहवेदीवर चढला. लगेच दुसऱ्या दिवशी (ता. ८) सायंकाळी पाच वाजता अंगावरची हळद निघण्यापूर्वीच विष प्यायला. दीड महिन्यापासून जगण्यासाठी सुरू असलेला त्याचा संघर्ष अखेर आज पहाटे (Youth Consumed Poison Day After His Wedding) थांबला. अशोक सुरेश यावारी (वय २२, रा. गडहिंग्लज) असे या मृत युवकाचे नाव आहे.