

Gokul Chairman Election Satej Patil
esakal
Gokul Chairman Election : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून कोरमचा पेच निर्माण होण्याची शक्यता असताना, समविचारी आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांनी २५ संचालक एकत्र येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्यक्ष करण्यासाठी सर्व संचालक पुढे येतील. निवडणुकीतील राजकीय मतभेद बाजूला ठेवून दूध संघाच्या हितासाठी सर्वजण एकत्र येतात. त्यामुळे अध्यक्ष निवडीची सभा कोरमअभावी अडेल, असे वाटत नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.