मोरेवाडीत तब्बल २६ लाखांचा मद्यसाठा जप्त; एक्साईजची कारवाई

या प्रकरणात संशयिताचे आणखी काही साथिदार आहेत का? याचा तपास सुरू आहे.
kolhapur
kolhapuresakal
Updated on
Summary

या प्रकरणात संशयिताचे आणखी काही साथिदार आहेत का? याचा तपास सुरू आहे.

कोल्हापूर - होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोरेवाडी (ता. करवीर) परिसरातून राज्य उत्पान शुल्क विभागाने २५ लाख ८६ हजार रुपये किमंतीचा मद्यसाठा आणि ट्रक जप्त केला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. सद्दामहुसेन आदम मुल्ला (वय ३१) असे त्या संशयिताचे नाव असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

kolhapur
ट्रकसह तब्बल १७ लाखांचा मद्यसाठा जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी, जिल्हा भरारी पथकास काल मोरेवाडी परिसरातील एका इमारतीत बेकायदेशीर मद्यसाठा करून त्याची शहर परिसरात वाहतूक व विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सायंकाळी पथकाने येथे छापा टाकला. येथील एका इमारती शेजारी उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली. त्यामध्ये २५ लाख ८६ हजार ९२० रूपये किमंतीचे मद्याचे २२८ बॉक्स आणि ट्रक असा एकूण ३० लाख ६७ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात संशयिताचे आणखी काही साथिदार आहेत का? याचा तपास सुरू असल्याचे पथक प्रमुख संभाजी बरगे यांनी सांगितले. ही कारवाई बरगे यांच्यासह निरीक्षक जगन्नाथ पाटील कर्मचारी सचिन काळेल, योगराज दळवी, मनोज पोवार, मारुती पोवार, जय शिनगारे, राजेंद्र कोळी, जयदीप ठमके, शिवाजी पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MCOCA Accused Suraj Sakhare Shot In Kolhapur
India Alliance support for Sonam Wangchuk protest
Mental harassment over baby boy demand
Kolhapur Dowry death case asmita katkar
Marathi News Esakal
www.esakal.com