लई भारी! कोल्हापुरच्या सोनालीचा व्हिडीओ प्रियंका चोप्राने केला शेअर

लहानपणासून त्यांना असलेल्या मेंहदी काढण्याच्या छंदाने त्यांना सध्या सोशल मिडीयावर सेलिब्रिटी बनवले
लई भारी! कोल्हापुरच्या सोनालीचा व्हिडीओ प्रियंका चोप्राने केला शेअर
Updated on: 

कोल्हापूर : आपल्या छंदाचे व्हिडीओ टिक टॉक, (tik-tok) इन्स्ट्राग्रामवर पोस्ट करणाऱ्या कोल्हापुरच्या (kolhpaur) सोनाली वाघरी. त्या मेहंदी आर्टीस्ट आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ अभिनेत्री प्रियंका चोप्रा (priyanka chopra) यांनी शेअर आणि सोनाली चर्चेत आल्या आहेत. लहानपणासुन त्यांना असलेल्या मेंहदी काढण्याच्या छंदाने त्यांना सध्या सोशल मिडीयावर सेलिब्रिटी बनवले आहे. (social media celebrity)

सोनाली मुळच्या मुंबईच्या. आठ वर्षा पुर्वी कोल्हापुरात लग्न होऊन आल्या. शाहुपुरी कुंभार गल्लीतील दिपक वाघरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दिपक यांचा मसाले विकण्याचा व्यवसाय. सोनाली कोल्हापुरात रमल्या खऱ्या परंतु त्यांचा मेहंदी काढण्याचा छंद त्यांना स्वस्थ बसु देत नव्हता. मुंबईच्या जुहू बीचवरच सोनाली यांच बालपण गेलं. घरची गरिबी असल्याने बीचवर येणारे पर्यटकांना त्या मेंहदी काढु लागल्या. त्यातून काही पैसे मिळू लागले.

लई भारी! कोल्हापुरच्या सोनालीचा व्हिडीओ प्रियंका चोप्राने केला शेअर
'राज्य किल्ले योजनेत अनेक त्रुटी; संभाजीराजे

विदेशी पर्यटकांशी संवाद साधत असल्याने त्यांनी इंग्रजी भाषा ही अवगत केली. फी भरायला पैसे नसल्याने सोनालीची शाळा सातवीतच सुटली. पुढे कोण प्रशिक्षणा शिवाय त्यांनी मेहंदी आर्ट अवगत केलं बीचवर येणाऱ्या मोठ्या सेलिब्रिटीजनाही त्यांनी मेहंदी काढली. लग्नानंतर कोल्हापूरातही त्यांनी ही मेहंदीची कला जपली. सुरवातीला टिक टॉकच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या कलेचे व्हिडीओ पोस्ट केले.

सध्या इंस्ट्राग्राम रिल्सच्या माध्यमातून त्या त्यांची कला तसेच इंग्रजी संवाद असलेले मार्मिक व्हिडीओ पोस्ट करत आहेत. या व्हिडीओलाच प्रतिक्रीया प्रियंका चोप्रा यांनी दिली. तसेच त्यांना प्रोत्साहन मेसेजच्या माध्यमातून दिले. या घटनेमुळे सोनाली यांना आनंद झाला आहे. सध्या त्यांचे 21 हजार फॉलोवर्स इंस्ट्राग्रामवर आहेत.

लई भारी! कोल्हापुरच्या सोनालीचा व्हिडीओ प्रियंका चोप्राने केला शेअर
देवगडच्या घाडींचा नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

सोनाली सांगतात, त्यांना या कामात पती, सासू यांचा मोठा पाठिंबा आहे. ते त्यांचे कौतुक करतात. मुंबईत गरिबी मुळे शिकता आलं नाही. कुठला कोर्स करता आला नाही पण हा छंद जोपासला. लग्न तसेच विविध कार्यक्रमात त्यांना मेहंदी काढण्याच्या ऑर्डर येतात. त्यांतून त्यांना काही पैसे मिळतात. संसाराला हात भार लागतो. परंतू सध्या कोरोनाचा संसर्ग असल्याने त्यांना जास्त ऑर्डर मिळत नाहीत. महाद्वार रोडला त्यांचा आर्टिफिशियल ज्‍वेलरीचा छोटासा स्टॉल देखील आहे. या माध्यमातून त्या ज्वेलरीची विक्री करुन संसाराचा गाडा ढकलत आहेत.

मेहंदी काढणे हे माझे पॅशन आहे.प्रियंका चोप्राने माझा व्हिडीओ शेअर केल्याने मला खुप आनंद झाला.मला पुढे मेक अप आर्टीस्ट देखील व्हायचे आहे.त्यासाठी विशेष कोर्स करावा लागणार आहे.आर्थिक खर्च अधिक असल्याने ते थांबले आहे.

- सोनाली वाघरी (मेहंदी आर्टीस्ट)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com