महाराष्ट्राच्या वरद पोळचा सनसनाटी विजय

महाराष्ट्राच्या वरद पोळचा सनसनाटी विजय
Published on

14957
कोल्हापूर : सोळा वर्षांखालील राष्ट्रीय ज्युनिअर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत फटका मारण्याच्या तयारीत असलेला महाराष्ट्राचा वरद पोळ.
.................
लोगो ः रमेश देसाई मेमोरियल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा

महाराष्ट्राच्या वरद पोळचा सनसनाटी विजय

उत्तर प्रदेशच्या ऋषी यादवचा ६-३, ६-३ सेटने पराभव

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : एकोणिसाव्या रमेश देसाई मेमोरियल १६ वर्षांखालील राष्ट्रीय ज्युनिअर टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या वरद पोळने सनसनाटी विजयाची नोंद केली. त्याने उत्तर प्रदेशच्या द्वितीय मानांकित ऋषी यादवचा ६-३, ६-३ सेटने पराभव केला. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व कोल्हापूर जिल्हा टेनिस संघटनेतर्फे (केडीएलटीए) ही स्पर्धा केडीएलटीए टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरू आहे.
मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या रिद्धी शिंदेने शिबानी गुप्तेचा टायब्रेकरवर ५-७, ७-६ (५), ६-२ सेटने पराभव केला. महाराष्ट्राच्या श्रेया पठारेने क्वालिफायर प्रार्थना खेडकरचा ६-०, ६-२ सेटने, महाराष्ट्राच्याच स्वनिका रॉय हिने गुजरातच्या एंजल पटेलचा ६-०, ६-४ सेटने पराभव करत आगेकूच केली. मध्य प्रदेशच्या अविशी शर्माने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या मेहक कपूरला ०-६, ६-०, ७-५ सेटने पराभूत केले. महाराष्ट्राच्या ध्रुवी आद्यंथने उत्तर प्रदेशच्या वर्णिका दीक्षितचे आव्हान ६-१, ६-० सेटने संपुष्टात आणले. क्वालिफायर महाराष्ट्राच्या श्रीमोई कामतने गुजरातच्या परिश्री मेघानीला ७-५, ६-३ सेटने हरवून दुसरी फेरी गाठली.
निकाल असा : पहिली फेरी मुले ः वाणीज पोथुनुरी (तेलंगणा) वि. वि. यज मलिक (१-६, ६-३, ६-४), विश्वजित सणस (महाराष्ट्र) वि. वि. मोक्षक चल्ला (तेलंगणा) (६-२, ६-१), वंशराज जलोटा (उत्तर प्रदेश) वि. वि. ध्रुव हेगडे (तेलंगणा) (७-६ (५), ६-३), वरद उंद्रे (महाराष्ट्र) वि. वि. अंशुल पोनुगोटी (महाराष्ट्र) (६-०, ६-१), शिवतेज शिरफुले (महाराष्ट्र) वि. वि. इशान खडीर (कर्नाटक) (६-२, ६-४), वरद पोळ (महाराष्ट्र) वि. वि. ऋषी यादव (उत्तर प्रदेश) (६-३, ६-३).
मुली : रिद्धी शिंदे (महाराष्ट्र) वि. वि. शिबानी गुप्ते (महाराष्ट्र) (५-७, ७-६ (५), ६-२), दीपशिका विनयगमूर्ती (तमिळनाडू) वि. वि. आद्या चौरसिया (कर्नाटक) (६-१, ५-७, ६-२), श्रीमोई कामत (महाराष्ट्र) वि. वि. परिश्री मेघानी (गुजरात) (७-५, ६-३), नीलाक्षी लाथेर (दिल्ली) वि. वि. काव्या देशमुख (महाराष्ट्र) (६-३, ७-५), हिया कुगसिया (गुजरात) वि. वि. मेहा पाटील (महाराष्ट्र) (७-५, ६-१), दिशा कुमार (कर्नाटक) वि. वि. साझी जैन (मध्य प्रदेश) (६-०, ६-२), देवश्री महाडेश्वर (महाराष्ट्र) वि. वि. ऋषिता पाटील (महाराष्ट्र) (६-४, ६-२), कीर्तना रंगिनेनी (तेलंगणा) वि. वि. अव्यक्ता रायवरपू (तेलंगणा) (६-३, ६-४), वृंदिका राजपूत (महाराष्ट्र) वि. वि. जोशिता गोली (मध्य प्रदेश) (६-०, ६-२), कृतिका वंगाला (तेलंगणा) वि. वि. अविपशा देहुरी (ओडिशा) (६-३, ६-४).
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com