Islampur Police Arrest Two Suspects in Alleged Assault Case
esakal
ईश्वरपूर (जि. सांगली) : येथील कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेऊन शीतपेयातून दारू पाजून महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या वीस वर्षीय विद्यार्थिनीवर दोघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली (Ishwarpur Sangli college student) आहे. याप्रकरणी वाळवा तालुक्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शार्दुल विद्यापती पाटील (वय २१, रेठरे धरण, ता. वाळवा), प्रथम सचिन पाटील (रा. ईश्वरपूर) अशी त्या दोघांची नावे आहेत. पीडित विद्यार्थिनी परजिल्ह्यातील असून, येथे शिक्षण घेत आहे. पीडित विद्यार्थिनीने ईश्वरपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.