Sangli ST 1519 special bus trips Ganesh festival
esakal
सांगली : गौरी-गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे परिसरातून कोकणात जाणाऱ्या आणि उत्सवानंतर परतणाऱ्या गणेशभक्तांसाठी सांगली विभागाने सोडलेल्या जादा बसफेऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद (Sangli ST special bus service Mumbai Thane Konkan) मिळाला. यंदा ४६० जादा बसेसच्या माध्यमातून १ हजार ५१९ फेऱ्या करण्यात आल्या. यातून ५७ हजार ८०९ प्रवाशांनी प्रवास केला. विभागाला १ कोटी ८४ लाख ७४ हजार १२६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात तब्बल २९ लाख ८० हजार १९१ रुपयांची वाढ झाली.