ढिसाळ कारभार : कोरोना झाला जूनला; यंत्रणा जागली ऑगस्टला!

संबंधित महिला ही चळवळीचा इतिहास असलेल्या कुटुंबातील आहे.
Covid19
Covid19
Updated on

सांगली : येथील एका प्रसिद्ध कुटुंबातील महिलेला जून महिन्यात कोरोनाची (Cororna) बाधा झाली. घरी थांबून उपचार घेत त्यांनी त्यावर मात केली. त्या कामावर रुजू झाल्या. दोन महिने उलटले. आता ऑगस्ट महिन्यात त्यांना महापालिकेतून फोन येत आहेत. ‘तुम्ही कोरोनाबाधित आहात, कुठे उपचार घेताय, घर सॅनिटायझर करायचे आहे, आम्ही येतोय...’ आदी प्रश्‍न, सूचनांनी भंडावून सोडले जात आहे. यातून महापालिका आरोग्य यंत्रणेच्या कोरोना व्यवस्थेतील ढिसाळ कारभार समोर आला आहे.

Summary

सांगली महापालिका आरोग्य यंत्रणेच्या कोरोना व्यवस्थेतील ढिसाळ कारभार समोर

संबंधित महिला ही चळवळीचा इतिहास असलेल्या कुटुंबातील आहे. त्या स्वतः चळवळीशी निगडित काम करतात. त्यांची कोरोना चाचणी १२ जून रोजी महापालिकेच्या अभयनगर आरोग्य केंद्रावर करण्यात आली. त्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यावेळी मनपा आरोग्य विभागातील कोणीही औषध उपचाराची चौकशी केली नाही. मनपाकडून पुढील कोणती कार्यवाही झाली नाही. त्या घरीच थांबून उपचार घेत बऱ्या झाल्या.

आता दोन महिने पूर्ण झाले. आज सकाळी त्यांना महापालिका आरोग्य विभागातून ‘तुम्ही पॉझिटिव्ह आला आहात, तुमच्यावर उपचार कुठे सुरू आहेत, घरीच आहात की कोविड सेंटरमध्ये? अशी विचारणा सुरू झाली आहे.घर सॅनिटाइज करायला व औषध फवारणी करण्यासाठी येत आहोत. आम्ही बोर्ड लावण्यासाठी येणार आहोत, असेही सांगितले जात आहे.

Covid19
कोट्यवधी खर्च केलेल्या कोकणातील पाच जलप्रकल्पांना गळती

या प्रकारावर ‘पॉझिटिव्ह रेट वाढवण्यासाठी व सोयीनुसार कमी करण्यासाठी महानगरपालिका असा खेळ करत आहे का?’, असा सवाल नागरिक मंचच्या सतीश साखळकर यांनी विचारला आहे. ते म्हणाले, ‘‘दररोजच्या दररोज पॉझिटिव्ह रुग्ण व बरे झालेले रुग्ण यांची आकडेवारी जाहीर होत असते, त्यावर विश्वास कसा ठेवायचा? आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकार व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com