भोंदू मनोहर मामा अन् भाजप नेत्यासह ८ जणांवर मोक्का; सोलापूर पोलिसांची कारवाई

Manohar Mama, Ramdas Zhol सोलापुरात भोंदूबाबा मनोहर मामा भोसले आणि भाजप नेत्यासह ८ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. भाजप नेता सध्या फरार असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Manohar Mama Case: Ramdas Zhol and 7 Others Face MCOCA Action

Manohar Mama Case: Ramdas Zhol and 7 Others Face MCOCA Action

Esakal

Updated on: 

भोंदूगिरी आणि आर्थिक फसवणुकीचे आरोप असलेला भोंदूबाबा मनोहर मामा भोसले आणि भाजप नेते रामदास झोळ यांच्यासह ८ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिलीय. मनोहर मामा भोसले याच्यावर आर्थिक फसवणूक, भोंदूगिरी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नागरिकांच्या अडचणी सोडवून देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्याचे आरोप त्याच्यावर आहेत. कर्करोगासारखे गंभीर आजार बरे करण्याचे आश्वासन देऊन आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामतीत, तर मणक्याचा आजार बरा करण्याचे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com