बोरामणीत दरोडा, दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक जखमी

मंगळवारी पहाटे दीड ते साडेतीनच्या सुमारास पाच दरोडेखोर बोरामणीत आले.
Crime
Crimesakal
Updated on
Summary

मंगळवारी पहाटे दीड ते साडेतीनच्या सुमारास पाच दरोडेखोर बोरामणीत आले.

सोलापूर : द. सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावाजवळील पाटील व हिरजे या दोन कुटुंबियाच्या घरी पाच दरोडेखोरांनी मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. बाबू कल्लप्पा हिरजे या ६५ वर्षीय वृद्धाचा दरोडेखोराच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

Crime
सोलापूर : जगाच्या पोशिंद्याची उदरनिर्वाहासाठी धडपड

मंगळवारी पहाटे दीड ते साडेतीनच्या सुमारास पाच दरोडेखोर बोरामणीत आले. सुरवातीला बाबू हिरजे यांच्या घरी दरोडा टाकला. बाबू हिरजे व त्यांची पत्नी गाढ झोपेत होते. दरोडेखोरांनी पत्नीला चाकूचा धार दाखवून त्यांच्या गळ्यातील व कानातील दिड तोळाचे सोने हिसकावून घेतले. दरोडेखोरांना प्रतिकार करणारे बाबू हिरजे यांच्या डोक्यात दरोडेखोरांनी कु-र्हाडीसारख्या हत्याराने वार केला. रक्त्याच्या थराळ्यात पडलेल्या बाबू हिरडेंचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर दरोडेखोर पाटील यांच्या घरांपर्यंत पोहोचले. पाटील हे जागे झाल्याने त्या ठिकाणी दरोडे टाकण्याचा प्रयत्न फसला. दरोडेखोरांच्या झालेल्या जटापटीत पाटील यांच्या हाताला चाकू लागला. पाटील हे मोठमोठ्यांने आवाज केल्याने दरोडेखोर तिथून पळून गेले.

Crime
सोलापूर : शहरात गुन्हेगार पोलिसांनाही वरचढ

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव आणि सोलापूर ठाण्याचे पोलिस अधिकारी घटनास्थळी आहेत. बाबू हिरजे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या या धाडसी हल्ल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com