सोलापूर : शहरात गुन्हेगार पोलिसांनाही वरचढ

दोन महिन्यांत ५६ लाखांचे दागिने अन्‌ रोकड चोरीला
Criminal
Criminal sakal

सोलापूर: शहरातील घरासमोरील अथवा कार्यालयाबाहेरील दुचाकी, एटीएम सेंटर, कापड तथा मोबाइल दुकानात, मार्केट यार्डातील दुकाने, परगावी गेलेल्यांची बंद घरे फोडण्याचा सिलसिला सुरूच आहे. एवढेच नाही तर बसमध्ये चढताना आणि रिक्षातून प्रवास करतानाही चोरी होऊ लागली आहे. १ जानेवारी ते ३ मार्च या काळात शहरातील २४ ठिकाणी चोरी करून चोरट्यांनी तब्बल ५५ लाख ९८ हजार ५०० रुपयांचे दागिने व रोकड चोरून नेली आहे.

Criminal
अतिरिक्‍त उसाने डोळ्यात अश्रू! शेतात ऊस जळतोय, तरीही शेतकरी संघटना गप्प का?

शहरातील सात पोलिस ठाण्यांचे डीबी पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, पोलिस ठाण्याचे कर्मचारी, रात्रीची गस्त, दिवसभर वाहतूक पोलिसांची नाकाबंदी एवढी सगळी यंत्रणा असतानाही शहरातील चोरीचे प्रमाण कमी झालेले नाही, हे विशेष. रिक्‍त असलेली वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदेही आता भरण्यात आलेली आहेत. तरीही, मागील दोन महिन्यात शहरातून ६० पेक्षा अधिक दुचाकी, ४० पेक्षा अधिक मोबाइल चोरीला गेले आहेत.

चोरट्यांवरील ‘अंकुश’ आता ढिला झाल्याची स्थिती आहे. घरासमोर अथवा कामानिमित्त कार्यालयाबाहेर लावलेली दुचाकी सुरक्षित राहील की नाही, अशी दुचाकीस्वारांमध्ये भीती आहे. तर रिक्षातून प्रवास करताना घरापर्यंत जवळील दागिने, रोकड सुरक्षित राहील का, याची प्रवाशांना चिंता असते. परगावी जाताना भले मोठे कुलूप लावूनही चोरटे घरफोडी करून घरातील सोने, रोकड चोरून नेत आहेत. दुसरीकडे बनावट दागिने देऊन सराफ व्यापाऱ्यांची फसवणूक सुरू आहे. गळ्यात दागिने घालून बाहेर पडताना महिलांना चोरट्यांची भीती वाट आहे. या पार्श्‍वभूमीवर नूतन

Criminal
Solapur : शिवसेना पराभूत! जिल्ह्यात राष्ट्रवादी अव्वल तर भाजपची आगेकुच

पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांच्याकडून ठोस उपाययोजनांची नागरिकांना अपेक्षा आहे. परंतु, अजूनपर्यंत शहरातील चोरी, गुन्हेगारी कमी झालेली नाही.

सहानुभूती नको, सुरक्षेची हमी हवी

जखमी पक्ष्यांचे प्राण वाचविणे, निराधारांना शिलाई मशिनचे प्रशिक्षण देणे, पोलिस आयुक्‍तालयात विविध प्रकारची झाडे लावणे यातून पोलिस आयुक्‍त हरीश बैजल यांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. पण, दुसरीकडे शहरातील चोरट्यांची भीती, दहशत पूर्णपणे कमी करण्याची अपेक्षा शहरवासियांनी व्यक्‍त केली आहे. चोरी, गुन्हेगारी वाढल्यानंतर पोलिस ठाण्यांचे प्रभारी बदलले, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांची खांदेपालट कधी, असाही प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

Criminal
अतिरिक्‍त उसाने डोळ्यात अश्रू! शेतात ऊस जळतोय, तरीही शेतकरी संघटना गप्प का?

मोठ्या स्वरुपाचे तब्बल २४ गुन्हे

शांती अपार्टमेंट (जुळे सोलापूर), शेळगी, हनुमान नगर, एमआयडीसी परिसरातील म्हेत्रे नगर, राजस्व नगर, शिवाजी नगर (बाळे), आसरा हौसिंग सोसायटी (होटगी रोड), वैष्णवी नगर (विजयपूर रोड), आयएमएस कॉलेज परिसर, एकता नगर, मदनी नगर, भारतमाता नगर, रमा क्‍लिनिक, न्यू पाच्छा पेठ, मुकुंद नगर (भवानी पेठ), वसंत विहार, दक्षिण कसबा, मंत्रीचंडक आंगण (हैदराबाद रोड), एसटी स्टॅण्ड ते जुळे सोलापूर रस्ता, शुक्रवार पेठ, धर्मशाली लाईन (एसटी स्टॅण्डसमोर), बंजारा सोसायटी (विजयपूर रोड), शिंगी मळा (कुमठा नाका) आणि ललित नगर (शांती नगरजवळ) या २४ ठिकाणी मागील दोन महिन्यांत चोरी झाली असून तब्बल ५६ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com