

टेंभुर्णी - मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडची बैठक प्रदेश महासचिव स्नेहा खेडेकर आणि प्रदेशाध्यक्षा सीमा बोके यांच्या उपस्थितीत पुणे येथे पार पडली. या बैठकीमध्ये सर्वानुमते प्रा. मिनाक्षी जगदाळे यांची पुणे विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली व प्रदेशाध्यक्ष सीमा बोके यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.