

Solapur News Teacher Killed in Speed Breaker Accident Outside Collector Office Lack of Reflectors Raises Questions
sakal
सोलापूर: सात रस्ता ते पत्रकार भवन या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहनांचा वेग रोखण्यासाठी बांधलेला गतिरोधकच एका शिक्षिकेच्या मृत्यूचे कारण ठरला. गतिरोधकावर मारलेले पांढरे पट्टे पुसट झाले असताना रिफ्लेक्टर, सूचना फलक आणि पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याने सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवले गेल्याचा आरोप होत आहे. महापालिका प्रशासन व वाहतूक शाखेकडून पांढरे पट्टे मारल्याचे सांगून सारवासारव केली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी आंदोलन करून निषेध नोंदवला. तसेच संबंधितांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.