सोलापूर : अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले; कारवाईसाठी विशेष पथक

आयुक्‍तांकडे आलेल्या तक्रारीवरुन हे पथक थेट कारवाई करीत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Crime news
Crime newsesakal
Updated on

Solapur News : पोलिस चौकी, पोलिस ठाणे, प्रभारी पोलिस अधिकारी, अंमलदार, पोलिस ठाण्याअंतर्गत डीबी पथक, सहायक पोलिस आयुक्‍त, पोलिस उपायुक्‍त आणि शेवटी पोलिस आयुक्‍त, अशी रचना असतानाही पोलिस आयुक्‍त हरिष बैजल यांनी स्वतंत्र पोलिस पथकाची नियुक्‍ती केली आहे. अवैध व्यवसायाशी (Illegal business) संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्यांनी पथकाच्या माध्यमातून वॉच ठेवला आहे. आयुक्‍तांकडे आलेल्या तक्रारीवरुन हे पथक थेट कारवाई (Police Action) करीत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. (Solapur illegal business crime news)

शहरातील गुन्हेगारीला आळा बसविण्याचा प्रयत्न करताना तत्कालीन पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आत्मविश्‍वास वाढविला. त्यांच्या निरोप समारंभावेळी सर्वच पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले. मात्र, शिंदे यांना पदोन्नती मिळाल्यानंतर नूतन पोलिस आयुक्‍त बैजल यांचा स्वभाव कसा आहे, याबद्दल पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्येच चर्चा रंगली होती. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील बैजल हे शांत, संयमी स्वभावाचेच असतील, असा अनेकांचा समज होता.

Crime news
ओमिक्रॉनची रुग्णवाढ; PM मोदींच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक सुरु

मात्र, काही महिन्यांतच विजापूर रोडवरील नागेश ऑर्केस्ट्रा बारवर सहायक पोलिस आयुक्‍तांनी स्वत: कारवाई केल्यानंतर आयुक्‍तांनी विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनाच निलंबित केले. काही दिवसांनी कारवाई मागे घेतली, परंतु सहायक पोलिस निरीक्षकास निलंबित केले. सदर बझार पोलिस ठाण्यातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यांनी तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची मुख्यालयात बदली केली. त्यांच्यासह काही अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात तर काहींना मुख्यालयात घेतले.

पोलिस ठाण्याअंतर्गत सुरु असलेल्या अवैध व्यवसायांवर स्वतंत्रपणे वॉच ठेवून पारदर्शक कारवाईच्या निमित्ताने त्यांनी स्वतंत्र विशेष पथक नियुक्‍त केल्याचे बोलले जात आहे. या पथकाने कारवाई केल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्यासंबंधीचे उत्तर द्यावे लागणार हे निश्‍चित. पथकाच्या कारवाईनंतर त्या अवैध व्यवसायिकांसोबत पोलिस दलातील कोणाचे हितसंबंध आहेत का, याचाही शोध घेतला जात असल्याने आता सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची चिंता वाढल्याचेही बोलले जात आहे.

Crime news
ओमिक्रॉन, डेल्टा एकत्र आल्यास मानव जातीचा नाश; शास्त्रज्ञांना भीती

गुन्हेगारीला आळा बसवून शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या हेतूने विशेष पथकाची नियुक्‍ती केली आहे. अनेकांना ही बाब आवडणारी नाही, परंतु आपल्याला थेट मिळालेल्या माहितीवरुन हे पथक कारवाई करेल.

- हरिष बैजल, पोलिस आयुक्‍त, सोलापूर शहर

आयुक्‍तांच्या विशेष पथकाबद्दल थोडेसे...

- सहायक पोलिस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्याकडे पोलिसांच्या विशेष पथकाची धुरा

- कोणताही डाग नसलेले पाच पोलिस अंमलदार अन्‌ एक सहायक पोलिस निरीक्षकांचे हे पथक

- पथकाची एक नोव्हेंबर रोजी यावेळी नियुक्‍ती; पथकाने आतापर्यंत 15 एफआयआर दाखल

- एमआयडीसी पोलिस चौकीजवळच सुरु असलेल्या फ्रुट बिअर दुकानावरही पथकाची कारवाई

- पोलिस ठाण्यांकडून दुर्लक्षित अवैध व्यवसायांवर विशेष पथकाचा वॉच; पोलिस आयुक्‍तांनी पथकाला रोख स्वरुपात दिले बक्षीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police ASI
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
The programme was organised by Priyadarshini Mahila Vikas Mandal to support pilgrims during the Ashadhi Wari.
Thousands of devotees are expected to participate in the religious celebrations, with special arrangements for devotees including community fasting meals.
Marathi News Esakal
www.esakal.com