ओमिक्रॉन, डेल्टा एकत्र आल्यास मानव जातीचा नाश; शास्त्रज्ञांना भीती

Omicron updates: ओमिक्रॉन (Omicron) आणि डेल्टा (Delta) या व्हेरीयंटमधून (variant) आणखी एखादा व्हेरीयंट तयार होऊ शकतो जो त्यांच्यापेक्षाही अधिक घातक आणि संसर्गजन्य असू शकतो
omicron and delta varient
omicron and delta varient e sakal

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूनं Corona virus संपूर्ण जगास वेठीस धरलंय. गेल्यावर्षी कोरोनाचा कहर हळूहळू ओसरत असल्याचं दिसत असतानाचा या वर्षी कोरोनाचा दुसरी लाट आली. यावेळी डेल्टा व्हेरीयंटने "(Delta variant) भारतासह India जगभरात प्रंचंड हाहाकार माजवला. कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला. महत्प्रयासाने ही लाट थांबते ना थांबते तोपर्यंत नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत (South Africa) नवं उत्परिवर्तीत ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण सापडले. आता भारतासह जगभरात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढतच आहेत. कोरोनाच्या वारंवार होणाऱ्या उत्परिवर्तनामुळे त्यावर नियंत्रण ठेवणेही अवघड झाले आहे. कोरोना विषाणूचा डेल्टा प्रकार प्राणघातक lethal आहे. तर ओमिक्रॉन त्यापेक्षा जास्त वेगाने पसरतो. आता या दोन प्रकारांच्या एकत्रीकरणातून तिसरा सुपर व्हेरियंट (Super variant) तयार झाल्यास मोठा अनर्थ समोर येऊ शकतो, अशी भीती (Fear) शास्त्रज्ञांकडून (Scientist) व्यक्त होत आहे. (If the Omicron and Delta variants come together, the resulting super variant could be deadly.)

omicron and delta varient
Omicron : ब्रिटनमध्ये १२ वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला मान्यता

जर एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी (At the same time) डेल्टा व्हेरिएंट (Delta variant) आणि ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग झाला तर नवीन सुपर व्हेरिएंट उदयास येऊ शकते, असं अमेरिकतील फार्मा कंपनी मॉडर्नाचे (Pharma Company Moderna) मुख्य वैद्यकीय अधिकारी (CEO) डॉ. पॉल बर्टन यांनी म्हटले आहे .युनायटेड किंगडमच्या (UK) संसदेच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीसमोर त्यांनी सांगितले की कमकुवत प्रतिकारशक्ती (Immune System)असलेल्या लोकांमध्ये दोन्ही विषाणूंना एकत्र राहण्याची संधी मिळू शकते. डॉ बर्टन यांच्या मते डेल्टा आणि ओमिक्रॉन या दोन्ही व्हेरीयंटचे लोक युनायटेड किंगडममध्ये फिरत आहेत. यामुळे नवीन सुपर व्हेरियंटच्या शक्यतेला आणखी चालना मिळते.

omicron and delta varient
Omicron: ओमिक्रॉन व्हेरीयंट ठरतोय घातक; असे करा स्वतःचे संरक्षण

त्यांनी असंही सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतील काही पेपर्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, कमकुवत प्रतिकारशक्ती असलेले असे रुग्ण आढळून आले ज्यामध्ये ओमिक्रॉन आणि डेल्टा दोन्ही प्रकार आहेत. डॉ बर्टन म्हणाले की, यूकेमध्ये पसरलेल्या प्रकरणांची संख्या पाहता अशी प्रकरणे येथे येण्याची शक्यता आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल सायन्स अँड रिसर्चचे शास्त्रज्ञ माईक बन्स यांनी म्हटले आहे की, ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरियंट एकत्र येण्याची शक्यता आहे. जेव्हा रुग्णाला एकाच वेळी दोन्ही प्रकारांची लागण होईल, तेव्हा अशी शक्यता निर्माण होते. सिडनीतील वेस्टमीड इन्स्टिट्यूटमधील व्हायरोलॉजिस्ट सारा पामर म्हणतात की, ओमिक्रॉनमध्ये अल्फा आणि डेल्टा प्रकारातील मिश्रित जीन्स असल्याचे सूचित करतात.

omicron and delta varient
Omicron Updates : देशात 14 राज्यांत ओमिक्रॉनची नोंद; रूग्णसंख्या 284 वर

ओमिक्रॉन आणि डेल्टा या व्हेरीयंटमधून आणखी एखादा व्हेरीयंट तयार होऊ शकतो जो त्यांच्यापेक्षाही अधिक घातक आणि संसर्गजन्य असू शकतो. ओमिक्रॉनची संसर्गजन्यता आणि डेल्टाची प्राणघातकता पाहता शास्त्रज्ञ त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.

नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेल्या ओमिक्रॉन व्हेरीयंटच्या स्पाइक प्रोटीनमध्ये 32 उत्परिवर्तन आहेत. तज्ञ म्हणतात की, हा प्रकार विषाणूच्या इतर प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य आणि धोकादायक असू शकतो. याआधी, कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराने यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात भारतात मोठ्या प्रमाणावर विनाश घडवला होता. आताही हा प्रकार युरोप आणि अमेरिकेत पसरला आहे.

omicron and delta varient
Omicron : वॉर रूम पुन्हा सज्ज करा; केंद्राचे राज्यांना पत्र

ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरीयंट एकत्र येऊन नवा सुपर व्हेरीयंट तयार होऊ नये, यासाठी लोक स्वतः उपाय करू शकतात. कोरोना संसर्ग टाळण्याचा हा एकमेव मार्ग आहे. यासाठी मास्कचा वापर करणे Using a mask, सोशल डिस्टन्सिंग Social distance आणि स्वच्छता Cleanliness हेच उपाय आहेत. प्रत्येकाने लस Vaccine घ्यावी. परंतु केवळ लस घेऊन बेसावध होऊन उपयोग नाही. इतर खबरदारी देखील गांभीर्याने घेतली पाहिजे. विशेषत: ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे, ज्यांना कोणत्याही आजाराने ग्रासले आहे किंवा ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे अशा लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com