

Solapur Nagar Panchayat Elections | Ward Delimitation 2027
सोलापूर : जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींच्या निवडणुकांची तयारी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. राज्यातील १०५ नगरपंचायतींची मुदत २७ फेब्रुवारी २०२७ रोजी संपत आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील वैराग (ता. बार्शी), माढा, श्रीपूर, माळशिरस आणि नातेपुते (ता. माळशिरस) या नगरपंचायतींचा समावेश आहे. या नगरपंचायतींच्या प्रभागरचनेसाठी शासन पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.