सांगलीत लोकशाहीर अण्णा भाऊंचा पुतळा उभारण्यासाठीचा मार्ग मोकळा

the stachu of annabhau sathe in sangli working coming soon for this year
the stachu of annabhau sathe in sangli working coming soon for this year
Updated on

सांगली : सांगली जिल्ह्याचे सुपुत्र, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षात सांगलीत भव्य पुतळा उभारण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्मवीर चौकातील जागेवर पुतळा उभारण्यास बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या माध्यमातून पुतळा परिसर विकसित केला जात आहे.

घोडावत फाउंडेशन परिसर विकासासाठी 50 लाखांचा निधी देणार आहे. आता लवकरच पुतळा उभारणीसंदर्भात आणि सांगलीतील स्मारकासंदर्भात बैठक होऊन निर्णय घेतला जाईल. जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष आकाश तिवडे, सचिव कुलदीप देवकुळे यांनी ही माहिती दिली. 

ते म्हणाले, 'लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची शंभरावी जयंती उत्साहात आणि व्यापक स्वरूपात साजरी करण्याचे नियोजन केले होते. परंतु, गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे शंभरावी जयंती साधेपणाने साजरी केली. अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचा सांगलीत पुतळा उभारला जावा, यासाठी सर्व पक्षांतील राजकीय नेते, पदाधिकारी प्रयत्नशील होते. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे काही काळ लांबला. परंतु, आता पुतळा उभारणीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्मवीर चौकातील जागेवर पुतळा उभारण्यास बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. महापालिका प्रशासनातर्फे नियोजित पुतळा परिसर विकसित केला जात आहे. मुरूमीकरण, वीज, पाणी आदी व्यवस्था केली आहे.

घोडावत फाउंडेशन 50 लाखांचा निधी देणार आहे. यंदा ऑगस्टमध्ये जन्मशताब्दी वर्षाची सांगता होईल. तत्पूर्वी, कर्मवीर चौकात पुतळा उभारण्यासंदर्भात पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हा प्रशासन, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि समिती यांची संयुक्त बैठक होईल. या बैठकीत पुतळा आणि स्मारक उभारणीसंदर्भात निर्णय घेतला जाईल.' नगरसेवक अभिजित भोसले, नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, असिफ बावा, सॅमसन तिवडे, मार्तंड लोंढे, बंडू केंगार, उत्तम मोहिते आदी या वेळी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com