

थांब्यांची मागणी आल्यास परवानगी मिळणार
शहरात १२३ थांब्यांना आरटीओने मान्यता दिली आहे. मात्र, भविष्यात रिक्षा संघटना आणि प्रतिनिधींनी नवीन रिक्षा थांब्याची मागणी केल्यास त्या ठिकाणाचे सर्व्हेक्षण करुन मान्यतेसाठी ‘आरटीए’समोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली आहे. रिक्षा चालकांनी अधिकृत रिक्षा थांब्यावरच रिक्षा उभ्या करण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
नियम काय आहे ?
दोन रिक्षा स्टॅण्डमध्ये १०० मीटर अंतर किंवा नागरिकांच्या गरजेनुसार स्टॅण्ड असावा असा नियम आहे. पण, शहरात अनेक ठिकाणी एकमेकांजवळ रिक्षा स्टॅण्ड असल्याचे दिसून आले होते. आता आरटीओने काही जुने थांबे रद्द केले आहेत.
पिंपरी आरटीओ क्षेत्रातील रिक्षा संख्या
२०२३ - ३४,५५९
२०२४ - ६,२९४
२०२५ - २,४२३
एकूण - ४४,७९४
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.