AADI ANANT MARATHI MOVIE REVIEW
esakal
AADI ANANT MARATHI FILM STORY AND CAST: आजोबा आणि नातू यांचे नाते हे केवळ रक्ताचे नसते तर त्या नात्यामध्ये अमाप जिव्हाळा आणि प्रेम असते. त्या नात्यामध्ये माया, विश्वास आणि असंख्य सुंदर आठवणींचा एक बंध गुंफलेला असतो. आजोबा म्हणजे अनुभवाची शिदोरी, प्रेमाचा अथांग सागर आणि संस्कारांचा वटवृक्ष, तर नातू म्हणजे त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा नवा अंकुर. दोन वेगवेगळ्या पिढ्यांमधील हा संवाद, त्यांच्यातील निरागस मैत्री आणि एकमेकांशी जोडलेली भावनिक नाळ अनेकदा नकळत मनाला स्पर्शून जाते. याच आजोबा आणि नातवाच्या नात्यातील भावविश्व उलगडणारा चित्रपट म्हणजे ‘आदि अनंत’ हा चित्रपट. दिग्दर्शक महेश लिमयेने आजोबा आणि त्यांचा नातू यांची हृदयस्पर्शी आणि हळवी अशी कथा या चित्रपटामध्ये मांडली आहे. ही केवळ आजोबा आणि त्यांचा नातू यांची कहाणी नाही तर विचार करायला भाग पाडणारी अशी कथा आहे.