संजय कपूर अन् शाहीरच्या सूडाचा खेळ; 'अब होगा हिसाब २' चा ट्रेलर आऊट

AB HOGA HISAB season 2 : प्रेक्षकांच्या आग्रहाखातर 'अब होगा हिसाब' सीझन २ चा थरार 'या' दिवशी येतोय; ट्रेलर रिलीज
ab hoga hisab

ab hoga hisab

esakal

Updated on

पहिल्या सीझनच्या दणदणीत यशानंतर, प्रेक्षकांची लाडकी रिव्हेंज ड्रामा सीरिज ‘अब होगा हिसाब’ अवघ्या काही दिवसांतच आपल्या दुसऱ्या सीझनसह परत येत आहे. ॲमेझॉन एमएक्स प्लेअरने (Amazon MX Player) नुकताच या सीरिजच्या ‘सीझन २’ चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज केला आहे. अरे स्टुडिओची निर्मिती असलेला हा हाय-व्होल्टेज ड्रामा येत्या ३ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. गेल्या १८ जूनला रिलीज झालेल्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. उत्कंठावर्धक कथानक आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही सीरिज अल्पावधीतच कमालीची लोकप्रिय ठरली. प्रेक्षकांचा हाच उदंड प्रतिसाद पाहून मेकर्सनी अगदी विचार कल्यापेक्षाही लवकर दुसरा भाग आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com