

AMRUTA KHANVILKAR
ESAKAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर अनेक हिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलीये. मराठीसोबतच ती हिंदी सिनेमांमध्येही झळकलीये. नुकतीच तिची 'तस्करी' ही सीरिज आली होती. ज्यातील अमृताच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक झालं. त्यानंतर ती 'लग्नपंचमी' हे नाटक नाट्यरसिकांच्या भेटीला आलं. दमदार अशा या नाटकाचे लवकरच १०० प्रयोग पूर्ण होणार आहेत. मात्र त्यापूर्वीच अमृताने 'लग्न पंचमी' हे नाटक सोडलंय. तिने त्यामागचं कारणही सांगितलंय.