

GHAROGHARI MATICHYA CHULI
esakal
जर तुम्ही सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या जगात थोडे जरी सक्रिय असाल, तर कॉकरोच जनता पार्टी हे नाव गेल्या काही दिवसांत तुमच्या कानावर नक्कीच पडलं असेल. इन्स्टाग्रामवर एका साध्या विनोदाने सुरू झालेली ही प्रोफाईल आज इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झालीये. अवघ्या ६ दिवसांत या 'कॉकरोच जनता पार्टी'चे तब्बल ११.३ दशलक्ष (11.3M) फॉलोअर्स झाले आहेत. या उपरोधात्मक आणि काल्पनिक राजकीय चळवळीने सोशल मीडियावरील एक नवा टप्पा गाठलाय. लोकप्रियतेच्या बाबतीत या पार्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय जनता पार्टीलाही (८.७M फॉलोअर्स) मागे टाकलंय. इतकंच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही या पेजला फॉलो केलंय.