

KIARA ADVANI SIDDHRTH MALHOTRA SECOND PREGNANACY
ESAKAL
Bollywood News: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. पॉवर कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता त्यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कियारा दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची घोषणा केली आहे. या खास पोस्टमध्ये त्यांची मुलगी समायरादेखील दिसत आहे. वर्षभरापूर्वी ते दोघे आई वडील झाले होते. त्यांना मुलगी झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीये. चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.