

mrunal dusanis
esakal
मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानिस हिचा स्वतःचा चाहतावर्ग आहे. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मृणाल ‘हे मन बावरे’, ‘असं सासर सुरेख दिसली. बाई’, ‘तू तिथे मी’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये तिची प्रत्येक मालिका गाजली. आताही 'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेत ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. मात्र लग्नानंतर काही वर्ष ती नवऱ्यासोबत परदेशात होती. तिथे बाळंतपणापासून सगळंच तिने एकटीने केलं. शिवाय भारतातून जातानाच आपण अभिनय क्षेत्रात परत येणार नाही असं ठरवूनच ती गेली होती. आता एका मुलाखतीत तिने या निर्णयाबद्दल सांगितलंय.