NAGRAJ MANJULE ON BANDHU MOVIE
Esakal
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेल्या ‘बंधू’ चित्रपटाला आता प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याकडूनही कौतुकाची थाप मिळाली आहे. नागराज यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चित्रपटाचं आणि त्यातील कलाकारांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या पोस्टची सध्या मनोरंजनविश्वात चर्चा रंगली आहे. नितीन सिंधूविजय सुपेकर लिखित आणि दिग्दर्शित ‘बंधू’ हा चित्रपट २० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला.