

prajakta mali
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना मोहिनी घातली. तिच्या नृत्याचेही अनेक चाहते आहेत. ती स्वतः डान्स क्लास घेते. सोबतच प्राजक्ता एक उद्योजिकादेखील आहे. प्राजक्ताचं फार्म हाऊसदेखील आहे. सोबतच तिचा ज्वेलरीचा ब्रॅण्डदेखील आहे. तिने २०२३ रोजी स्वतःचा दागिन्यांचा ब्रॅण्ड सुरू केला होता, आता ३१ मार्चरोजी नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असतानाच प्राजक्ताने तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डसाठी मोठा निर्णय घेतलाय. तिने आपल्या ज्वेलरी ब्रॅण्डचं नाव बदललंय.