

riteish deshmukh on ajmer dargah
esakal
मराठी आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतलंय. ते चाहत्यांचे आवडते आहेत. ते कायमच सगळ्यांना कपल गोल्स देताना दिसतात. मात्र आता रितेश आणि जिनिलिया एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. शुक्रवारी रितेश आणि जिनिलिया यांनी सहकुटुंब अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली. त्यांचे तिथले काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत. दर्ग्यावर जाऊन त्यांनी फुलं आणि चादर अर्पण केली. तसेच कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थनाही केली. हे व्हिडिओ पाहून आता नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत.