

Children, Smartphones and Mental Health: Why Parents Need to Take Mobile Addiction Seriously
E sakal
Is the iPhone Craze Reaching Rural India? What Parents Need to Know About Children, Smartphones and Mental Health
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. शहराजवळील तिसगाव परिसरातील कुणाल चांदवडे हा १८ वर्षांचा मुलगा Apple कंपनीचा आयफोन 15 हवा म्हणून हट्टाला पेटला होता. त्याला वाचवण्याच्या नादात त्याच्या पालकांचाही यात दुर्दैवी मृत्यू झाला. एका मोबाइलपायी तीन आयुष्य हकनाक गेली.
आयफोन किंवा महागडा स्मार्टफोन आज तरुणांसाठी एक प्रतिष्ठेचा विषय झालाय. मोबाइल फोनचा ग्रामीण भागात होणारा प्रचंड प्रसार, कोविड काळाने दिलेली ऑनलाइन वापराची देणगी आणि मानसिक आरोग्य हा एक तिढा बनला आहे.
दुसरीकडे अॅपलसारख्या कंपन्या टियर २ आणि टियर ३ शहरांकडे त्यांची पुढची बाजारपेठ म्हणून पाहतायत. त्यावर अधिक लक्ष केंद्रीत करतायत, असं दिसतं. मोबाइल, मानसिकता आणि मुलं हा सगळा तिढा आपण नेमका सोडवणार तरी कसा आहोत?
शहरी असो वा ग्रामीण मानसिक कोंडीकडे आपण पुरेसे गांभीर्याने पाहतो का? ग्रामीण आणि शहरी भागातील मोबाइल दुष्परिणामांची, मानसिक समस्यांची दरी मिटत चालली आहे का, या सगळ्या सामाजिक स्थित्यंतराकडे नेमकं कसं पहायला हवं, या सगळ्या मुद्द्यांविषयी जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या विशेष लेखातून.