Euthanasia
Esakal
पुणे - इच्छामरण ही विचाराने मृत्यूपर्यंत जाण्याची गोष्ट आहे. इच्छामराणातही दोन भाग येतात एक विचारांती घेतलेला निर्णय आणि दुसरा दयामरण. दयामरण म्हणजे जगणं असह्य झालं म्हणून मरण्याची व्यक्त केलेली इच्छा.. तर स्वेच्छामरण म्हणजे वयाच्या एका टप्प्यावर आल्यावर सन्मानाने आणि विचारांती मरण्याची इच्छा व्यक्त करणे.. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे हे विचार..!
इच्छामरण असावं अशी मागणी आजवर अनेक सामाजिक संस्था आणि समाजातील व्यक्तींनी मांडली. अरूणा शानबाग यांच्या केसने ज्या इच्छामरणाला एक कायदेशीर वाट फुटली ते जावळपास १५ वर्षानंतर हरिश राणा यांच्या निमित्ताने एका टप्प्यावर येऊन पोहोचलं आहे. पण हा प्रवास एवढाच आहे का..? की अद्यापही कायद्यात सन्मानाने मरण या गोष्टीला स्थान मिळालेलं नाहीये. मागील १५ वर्षात कोणत्या कायदेशीर चौकटीतून हा इच्छामरणाचा प्रवास झाला. इच्छामरणाचा अर्थ लावताना न्यायालयाने काय आणि कसा विचार केला, या दरम्यान कायद्यात काय बदल झाले, सक्रिय मरण आणि निष्क्रिय मरण म्हणजे काय, त्यांचे अधिकार काय, काय आहे ‘लिव्हिंग विल’ हे सगळं जाणून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..