Premium| Nana Patekar Social Work : पती गमावलेल्या महिलांना आधार, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी अन् कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न; नानापाटेकरांच्या ‘नाम फाउंडेशन’ या संस्थेने आत्तापर्यंत हजारो कुटुंबांना आधार दिला आहे!

Naam Foundation : अभिनयासोबतच नाना पाटेकरांनी सामाजिक कार्यातूनही वेगळी ओळख निर्माण केली. शेतकरी कुटुंबांना मदत, जलसंधारण, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आपत्तीच्या काळातील मदतीसाठी ‘नाम फाउंडेशन’ने केलेल्या कामाची सविस्तर माहिती जाणून घ्या.
Nana Patekar Social Work

Nana Patekar Social Work

esakal

Updated on: 

चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारे नाना पाटेकर सामाजिक कार्यामुळेही कायम चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची सुरुवात केवळ प्रसिद्धीच्या वलयातून झालेली नाही. बालपणापासून अनुभवलेली गरिबी, संघर्ष आणि सामान्य माणसाच्या अडचणींची जवळून झालेली ओळख यामुळे समाजातील वंचित घटकांविषयीची त्यांची संवेदनशीलता अधिक घट्ट झाली. महाराष्ट्रातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण भागातील पाण्याचे संकट यामुळे अस्वस्थ झाल्यानंतर त्यांनी या लोकांसाठी स्वत:ला अक्षरश: वाहून घ्यायचं ठरवलं

मकरंद अनासपुरे यांच्या सोबतीने सप्टेंबर २०१५ मध्ये ‘नाम फाउंडेशन’ची स्थापना झाली आणि शेतकरी कुटुंबांना मदत करण्यापासून सुरू झालेला हा प्रवास पुढे जलसंधारण, ग्रामीण विकास, शिक्षण, महिला सक्षमीकरण, शेतीपूरक व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीपर्यंत पोहोचला. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासोबतच त्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न, गावकऱ्यांच्या सहभागातून जलसंधारणाची कामे आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळातील मदतकार्य यामुळे या उपक्रमाचे स्वरूप व्यापक झाले.

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नाम फाउंडेशनने नेमकी कोणती जलसंधारणाची कामे केली? शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक शेती आणि शेतीपूरक व्यवसायांचा वापर कसा करण्यात आला? पूर, चक्रीवादळ आणि कोरोना महामारीसारख्या संकटांच्या काळात नाना पाटेकर आणि नाम फाउंडेशनने कोणती मदत केली? या विषयी सविस्तर जाणून घ्या सकाळ+च्या या लेखातून

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com