Premium|Prathamesh Shivalkar : गावाकडच्या मातीत रुजलेला, अभिनयाच्या क्षेत्रात उमललेला प्रथमेश शिवलकर अर्थात पम्या

Marathi Theatre and Acting : गावाकडच्या मातीशी नाळ जोडून ठेवत अभिनय, लेखन आणि विनोदाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या प्रथमेश शिवलकर अर्थात पम्या यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कलाप्रवासाचा वेध.
Marathi Theatre and Acting

Marathi Theatre and Acting

esakal

Updated on: 

आशिष पाथरे - sakal.avtaran@gmail.com

एखाद्याच्या आयुष्याचा प्रवास हा केवळ यशाच्या टप्प्यांनी मोजता येत नाही; तर त्यात जपलेली माणसं, जोपासलेली स्वप्नं आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही महत्त्वाचा असतो. गावाकडच्या मातीशी नाळ जोडून ठेवत अभिनय, लेखन आणि विनोदाच्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणारा प्रथमेश शिवलकर अर्थात ‘पम्या’ म्हणजे एक अजब रसायन. स्वभावातला निरागसपणा, नवनवीन गोष्टी करण्याची धडपड आणि आयुष्य भरभरून जगण्याचं वेड हे सारं त्याच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची देतं.

पम्या... तू एक ‘शहाणा वेडा’ आहेस. तुझ्या डोळ्यांत नितळ आणि परिपूर्ण जगण्याचं वेड आहे अन् तुझ्या वागण्यात कुठूनसा आलेला परिपक्व शहाणपणा आहे. खूप रेअर आहे हे कॉम्बिनेशन!

डोंबिवलीच्या कावेरी हॉस्पिटलमध्ये तू जन्माला आलास. साने गुरुजी सेवा मंडळाच्या पांडुरंग शाळेत आणि रा. वि. नेरूरकर हायस्कूलला दहावीपर्यंत शिकलास. यात कुठे आलं कलाक्षेत्र? फार फार तर पुढे जाऊन बँकेत चिकटण्याची ही जर्नी असू शकते. मात्र तूच तुझ्या आयुष्याचा कोलंबस असल्यामुळे टॅलेंटचा नवा भाग तू शोधून काढलास.

लोक गावाहून शहरात येतात. तू पोर्ट ट्रस्टमध्ये असलेल्या वडिलांच्या गावी जाण्याच्या निर्णयामुळे शहरातून गावात पोहोचलास. म्हामुरवाडी हे रत्नागिरी शहरापासून जवळ असलेलं टिपिकल कोकणातलं गाव. तुझी नाळ जिथे तीनशे फूट खोल पुरलेली आहे, असं तुला न सोडवणारं गाव. तिथून गोगटे-जोगळेकरला कॉलेज शिकताना तुझ्या काय कोणाच्याच गावी नव्हतं, की तू मराठीतला एक सुंदर अभिनेता आणि लेखक होशील!

अख्ख्या भारतासारखंच चेंडूफळी या खेळाचं तुला अतीव वेड. तुझी मॅच चालू असतानाची उत्स्फूर्त कॉमेंटरी ऐकून कॉलेजच्या आंबेकर सरांनी तुला मुंबई विद्यापीठाच्या स्कीट स्पर्धेसाठी पाठवलं. तिथे शशिकांत केरकर आणि विनोद जाधवने तुझी निवड केली. तुझं कसंय ना, जे भावलं ते मनापासून आणि जे नाही भावलं... निघा तिथून! पण इथून मात्र तुझा पाय निघाला नाही. सामान्य माणसाला एक भूमिका आणि पात्र मिळवून देणारं हे नाटकाचं जग तुला भावलं. तू रमलास.

Loading content, please wait...