Premium|US Iran war impact on Dubai tourism : युद्धाचा ‘दुबई ब्रँड’ला मोठा फटका; पर्यटकांची पाठ अन् अब्जावधींच्या गुंतवणुकीचे निर्णय लांबणीवर!

How Middle East Conflict Affects Global Business Hubs : अमेरिका-इराण युद्धाच्या इम्पॅक्टमुळे दुबईच्या आलिशान आणि सुरक्षित जागतिक प्रतिमेला मोठा हादरा बसला असून, पर्यटन घटल्याने आणि कॉर्पोरेट निर्णय लांबणीवर पडल्याने तेथील अर्थव्यवस्थेवर तात्कालिक गंभीर परिणाम दिसून येत आहेत.
US Iran war impact on Dubai tourism

US Iran war impact on Dubai tourism

esakal

Updated on

डॉ. अमिताभ सिंग

अमेरिका-इराण युद्धामुळे मोठ्या मेहनतीने अन् काळजीपूर्वक उभारण्यात आलेल्या दुबईच्या जागतिक प्रतिमेला मोठा हादरा बसला आहे. मात्र, तो कायमस्वरूपी असेलच असे नाही. युद्धामुळे ‘दुबई ब्रँड’चा शेवट झाला नसला, तरी आता तो पुन्हा उभा राहण्याचा वेग सुरळीत सुरक्षा व्यवस्था, पर्यटकांचा विश्वास आणि सरकारच्या धोरणात्मक प्रतिसादांवर अवलंबून असेल.

सुरक्षा, सुनिश्चितता आणि ऐषोराम अन् आलिशान श्रीमंती अनुभव अशा तीन परस्परसंबंधित आश्वासनांवर दुबईची ब्रॅण्ड व्हॅल्यू अवलंबून होती. मात्र, इराणच्या हल्ल्यांमुळे आणि त्यानंतरच्या परिणामांमुळे या कथेलाच थेट हादरा बसला. हॉटेल, वाहतूक व्यवस्था आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे दिसण्याइतपत झालेले नुकसान, त्याची जागतिक स्तरावर प्रसारित झालेली छायाचित्रे, व्हिडिओ आणि वृत्तांकन तसेच प्रत्यक्षदर्शींचा हवाला देऊन केलेल्या बातम्यांमुळे ‘अशांत विभागातील शांत प्रदेश’ म्हणून असलेले दुबईचे महत्त्व चांगलेच कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि लक्झरी ब्रॅण्ड्स नेहमीच किंमत आणि स्टाईलबरोबरच सुरक्षा अन् गैरसोय यावर आधारित निर्णय करत असतात. मात्र, या युद्ध संघर्षाचा फटका प्रामुख्याने दुबईच्या प्रतिष्ठेला बसला. परिणामी अनेक सहली रद्द झाल्या, विविध आंतरराष्ट्रीय कार्यक्रम पुढे ढकलले गेले आणि दुबईकडे वळणारा पर्यटकांचा ओघही काही प्रमाणात मंदावला.

US Iran war impact on Dubai tourism
Premium|Long-term investing discipline : सातत्य, संयम आणि शिस्त हीच दीर्घकालीन यशाची गुरुकिल्ली
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com