Premium|RBI rate impact on EMIs : आरबीआयचा एक निर्णय आणि गृहकर्जाचा हप्ता वाढला; जाणून घ्या ईएमआय वाढण्यामागचे नेमके गणित!

RBI Interest Rate Hike Impact on Home Loan : रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर वाढीमुळे गृहकर्जाच्या मासिक हप्त्यात (EMI) होणाऱ्या बदलांचे रमेश-सुनीताच्या उदाहरणातून सोप्या भाषेत केलेले विश्लेषण आणि सर्वसामान्य कर्जदारांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक नियोजनाचा सविस्तर आढावा.
RBI Interest Rate Hike Impact on Home Loan

RBI Interest Rate Hike Impact on Home Loan

esakal

Updated on

डॉ. अमेय खरे

व्याजदर हा केवळ बँकेचा एक आकडा नसतो, तो तुमच्या महिन्याच्या बजेटशी, तुमच्या घराशी आणि तुमच्या दीर्घकालीन आर्थिक नियोजनाशी थेट जोडलेला असतो. आरबीआयचे निर्णय समजून घेणं म्हणजे स्वतःच्या अर्थकारणाची सूत्रं स्वतःच्या हाती ठेवणं.

आरबीआय एखादा निर्णय घेते आणि तुमच्या घराचा हप्ता वाढतो, हे कसं घडतं? हे प्रत्येक कर्जदारानं समजून घेणं आवश्यक आहे. एक उदाहरण पाहू या. रमेश आणि सुनीतानं तीन वर्षांपूर्वी गृहकर्ज घेतलं होतं. त्यावेळी ईएमआय होता २२,५०० रुपये. पण गेल्यावर्षी बँकेचं पत्र आलं आणि ईएमआय वाढून २५,२०० रुपये झाला. त्यांनी काहीही केलं नव्हतं, तरीही हा बदल झाला; कारण काय? तर आरबीआयनं व्याजदर वाढवले होते. अशा परिस्थितीत आपण काय करू शकतो?

मागच्या लेखात (बचत vs गुंतवणूक, ता. २३ मे) आपण बचत आणि गुंतवणूक यांच्यातला फरक पाहिला. त्या चर्चेत एक महत्त्वाचा धागा होता, तो म्हणजे व्याजदर. व्याजदर आपल्या बचतीवरचा परतावा ठरवतो, आणि त्याचबरोबर आपल्या कर्जाचा खर्चही ठरवतो. या लेखात आपण व्याजदर आणि ईएमआय यांचं नातं, आरबीआयचं त्यातील स्थान, आणि सर्वसामान्य कर्जदारानं काय लक्षात ठेवायला हवं, हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com