

Indrayani River Pollution Alandi Launches Amrut Stambh Facility Offering Purified Water Bathing for Devotees at 20 Rupees
sakal
आळंदी: श्री क्षेत्र आळंदीत इंद्रायणी नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे तीर्थस्नानाला मुकलेल्या भाविकांसाठी नगर परिषदेने ‘अमृत स्तंभ’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत नदीघाटावरच पाणी शुद्ध करून केवळ वीस रुपये शुल्कात स्नानासाठी उपलब्ध करून दिले जात आहे. या योजनेमुळे भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित स्नानाचा पर्याय मिळाला आहे.