

Sunetra Pawar seeks unopposed victory in Baramati by-election as Congress fields candidate, intensifying Maharashtra political dynamics.
esakal
Baramati bypoll : राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान कॉंग्रेसने सुनेत्रा पवाराविरोधात उमेदवार दिल्याने राज्यभर चर्चा सुरु आहे. सुनेत्रा पवार यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करुन माघार घेण्याची विनंती केली आहे. अशातच आता शरद पवार यांनीही बारामतीची निवडणूक कॉंग्रेसने बिनविरोध करावी असा सल्ला दिला आहे. यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.