Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

महाळुंगे-सूस परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एका वर्गमित्राने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
crime

crime

ESakal

Updated on: 

पुणे/बावधन - महाळुंगे-सूस परिसरातील एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील एका वर्गमित्राने इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २३) दुपारी घडली. इन्स्टाग्रामवर टाकलेल्या एका व्हिडिओवरून झालेल्या वादाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, बावधन पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com