reshma Goyal and Ananya Fadake
sakal
- प्रज्वल रामटेके
पुणे - लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे उराशी बाळगलेले स्वप्न, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील अधिकाऱ्यांचा रुबाबदार गणवेश अंगावर परिधान करण्याची ओढ आणि बॅडमिंटनच्या कोर्टवर मिळवलेले सुवर्णपदक... या सर्व गोष्टींची सांगड घालत पुण्याच्या अनन्या फडके हिने सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयातून (एएफएमसी) थेट ‘फ्लाइंग ऑफिसर’ होण्यापर्यंतचा प्रेरणादायी पल्ला गाठला आहे. तर दुसरीकडे, वडिलांचा लष्करी वारसा पुढे नेत, पण स्वतःची वेगळी वाट चोखंदळपणे निवडत रेश्मा गोयल हिने नौदलात धडक मारली आहे. ‘एएफएमसी’च्या दीक्षान्त संचलन सोहळ्यात या दोन तरुणींच्या यशाच्या कथा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.