

Police Expand Lohagad Murder Probe, Question Friends and Relatives of Main Accused
esakal
पुणे : लोहगड किल्ल्यावरील केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीचे मित्र पोलिसांच्या रडारवर असून, त्याच्या एका वर्गमित्राची कसून चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान चेतनशी निगडित इतर मित्रांसह त्याच्या नातेवाइकांकडेही चौकशी सुरू आहे, तसेच या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी शुक्रवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत दिली.