Pune Crime Ladki Bahin Scam : 'लाडकी बहीण' योजनेच्या बहाण्याने घरात शिरली; मालिश करण्याच्या बहाण्याने सोनसाखळी चोरली!

पुण्याच्या लष्कर परिसरातील न्यू मोदी खाना येथे धक्कादायक प्रकार; एकट्या राहणाऱ्या ७५ वर्षीय आजारी महिलेची फसवणूक, ३० ते ३५ वर्षीय अनोळखी महिलेवर गुन्हा दाखल.
Entered house on pretext of 'Ladki Bahin' scheme and stole Rs 60,000 chain.

Entered house on pretext of 'Ladki Bahin' scheme and stole Rs 60,000 chain.

Sakal

Updated on: 

‘लाडकी बहीण’ योजनेची माहिती देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करून एका ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. मानेची मालिश करून देण्याचे आमिष दाखवत आरोपी महिलेने उशीखाली ठेवलेली ६० हजार रुपये किमतीची सोन्याची माळ लंपास केली. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात ३० ते ३५ वर्षांच्या अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...