

Rain to Intensify Across Pune; Red Alert Declared for Ghat Region
esakal
पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस शहरात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. विशेषतः घाट विभागात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने घाट विभागाला पुढील तीन दिवसांसाठी ‘रेड’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.