Vidyadhar Anaskar
sakal
पुणे - देशांतर्गत आणि जागतिक पातळीवर वाढणाऱ्या महागाईच्या दबावामुळे रिझर्व्ह बँकेने आज जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. आरबीआयने नजीकच्या भविष्यात व्याजदरात कपात होण्याची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावल्याने आगामी काळात कर्जावरील व्याजदर वाढतच जाणार हे स्पष्ट झाले असून, सर्वसामान्यांचे गृह व वाहन कर्ज महागणार असल्याची शक्यता बँकिंग तज्ञ आणि राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केली.