

Shirur News Two Families Clash Over Gram Panchayat Membership Post With Weapons and Police Register Cases Against 11 People
esakal
शिरूर : शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या राजकारणात गावकी व भावकीत वाद पेटला असून, ग्रामपंचायतीचे सदस्यपद देण्यावरून भावकीतील दोन कुटूंबात जोरदार हाणामारी झाली. कोयत्यासह रॉड आणि दांडक्याचा वापर झालेल्या या मारामारीत एका महिलेसह तरूण जखमी झाला असून, दोन्ही बाजूच्या ११ जणांविरूद्ध शिरूर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी बेकायदा जमाव जमवून मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बुधवारी (ता. १२) मध्यरात्री झालेल्या या वादात एका मोटारीची दगड टाकून व कुऱ्हाडीने तोडफोड करण्यात आली. भावकीतील दोन गट आमने - सामने आल्याने झालेल्या राड्यात एकमेकांचे सोन्याचे दागिने खेचल्याचे आरोप करण्यात आले आहेत.