

Union Commerce and Industry Minister Piyush Goyal addresses the media in Berlin, highlighting India-Germany partnerships in manufacturing, research, technology and investment.
esakal
बर्लिन : भारत-जर्मनी आर्थिक संबंध आता केवळ व्यापार आणि बाजारपेठेपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. जर्मन कंपन्या भारताकडे केवळ मोठी बाजारपेठ म्हणून नव्हे, तर उत्पादन, संशोधन, नवोन्मेष आणि जागतिक पुरवठा साखळीसाठी भागीदार म्हणून पाहू लागल्या आहेत, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
दोन दिवसांच्या बर्लिन दौऱ्याचा आढावा घेताना आयोजित पत्रकार परिषदेत गोयल बोलत होते. या दौऱ्यात व्यापार, गुंतवणूक, बाजारपेठ, उद्योग यांसोबतच भारतीय समुदाय, विद्यार्थी, संशोधन संस्था आणि जर्मन उद्योगांशी झालेल्या चर्चांचा त्यांनी उल्लेख केला. भारत-जर्मनी भागीदारीला आता व्यापारापासून तंत्रज्ञान, संशोधन, प्रतिभा आणि संयुक्त उत्पादनापर्यंत नेण्याची संधी निर्माण झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.