

Why bullion prices falling
Sakal
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचे नियोजन करणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. सणासुदीच्या खरेदीच्या तोंडावर देशांतर्गत सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीचा थेट परिणाम स्थानिक बाजारावर झाला असून, २४ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात एकाच दिवसात तब्बल ४ हजार रुपयांपेक्षा अधिक घसरण झाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.