

India Farmer IDs: देशात ११ हजार किसान पहचान पत्रांचे वाटप; मुदतीच्या पाच महिने उद्दिष्ट पूर्ण
esakal
केंद्र सरकारने अॅग्रीस्टॅक (AgriStack) उपक्रमांतर्गत देशातील ११ कोटी शेतकऱ्यांचे ११ अंकी डिजिटल ओळखपत्र तयार करण्याचे काम पूर्ण केले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शनिवारी ही माहिती दिली. मार्च २०२७ पर्यंत ११ कोटी फार्मर आयडी तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. मात्र, २३ ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंतच हे काम पूर्ण झाल्याने सरकारने मुदतीच्या पाच महिने आधी लक्ष्य गाठले आहे.