

Big Toll Rule Change: No Cash Payments, FASTag Required – UPI Gets Costly
eSakal
Fastag New Rules: राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आजपासून एक मोठा बदल लागू झाला आहे. 10 एप्रिलपासून टोल प्लाझावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल नियमांमध्ये सुधारणा करणारी एक अधिसूचना जारी केली आहे. आता सर्व टोल व्यवहार डिजिटल पद्धतीने केले जातील. यासाठी FASTag असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे फास्टॅग नसल्यास, तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता. पण, या पद्धतीने पेमेंट करणे तुम्हाला थोडे महागडे ठरणार आहे.