

8th Pay Commission: किमान वेतन ७२ हजारांपर्यंत वाढविण्याची वेतन आयोगाच्या मुंबईतील दोन दिवसीय बैठकीत मागणी
esakal
8th Central Pay Commission: आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची कर्मचारी संघटनांसोबतची दोन दिवसांची मुंबई येथील बैठक काल संपली. २२ आणि २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या बैठकीत केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांच्या वेतन, भत्ते आणि निवृत्तिवेतनविषयक मागण्यांवर चर्चा झाली. यापूर्वी आयोगाने ८ ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये बैठक घेतली होती.