

Trump administration IT company restrictions
esakal
Indian IT companies US ban: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने परदेशी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीशी संबंधित नियमांवरील कारवाई तीव्र केली आहे. गुरुवारी अमेरिकेच्या प्रशासनाने मायक्रोसॉफ्ट, इन्फोसिस, टाटा, विप्रो, एचसीएल, कॉग्निझंट, कॅपजेमिनी आणि अॅडोबी यांसारख्या प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांना कायमस्वरूपी कामगार प्रमाणपत्र कार्यक्रमातून (PERM) निलंबित केले. अमेरिकेत परदेशी कर्मचाऱ्यांना रोजगाराच्या आधारे ग्रीन कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेत हा कार्यक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या निर्णयामुळे एच-1बी व्हिसावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह ग्रीन कार्डसाठी प्रयत्न करणाऱ्या परदेशी व्यावसायिकांच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.